Share

“निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!

संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. ‘उष्टं खरकटं’ विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Published On: 

Uddhav Thackeray Speech, Raosaheb Danve

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर- राजकारणात शब्दांचे वार किती तीक्ष्ण आणि जिव्हारी लागणारे असू शकतात, याचा अनुभव आज पुन्हा एकदा आला. “१९८८ मधील शिवसेनाप्रमुखांच्या त्या ऐतिहासिक सभेची आज आठवण झाली,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत अक्षरशः रान उठवलं. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला.

शिवसेनेची पुन्हा नव्याने सुरुवात करत असल्याचा एल्गार यावेळी ठाकरेंनी पुकारला. “ज्यांना ज्यांना पक्षाने भरभरून दिलं, ते खाऊन माजले आणि गद्दार झाले. पण या गद्दारीने आपले काहीच बिघडले नाही,” असा टोला त्यांनी लगावला. आज आपल्यासोबत अनेक नवे आणि तरुण चेहरे येत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Uddhav Thackeray Speech vs Raosaheb Danve

पण भाषणाचा खरा “हायलाईट” ठरला तो भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर केलेला वैयक्तिक प्रहार! ठाकरे यांनी दानवेंचा उल्लेख ‘पराभूत खासदार’ असा करत म्हणाले, “निवडणुकीत पडले तरी यांची मस्ती आणि माज काही कमी झालेला नाही.”

दानवेंनी मध्यंतरी ‘आमच्याकडे सगळे पक्ष जेवून गेलेत’ असं विधान केलं होतं. या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी थेट वर्मावर घाव घातला. “जर हे खरं असेल, तर मग तुम्ही आमच्या ताटातलं उष्टं खरकटं का खाताय? स्वतःच्या ताकदीवर तुमचं पोट का भरत नाही? इतकं खाऊनही तुमची भूक का संपत नाही?”

Uddhav Thackeray यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता याला भाजप आणि खुद्द रावसाहेब दानवे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही