Sanjay Raut । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उद्या (११ एप्रिल) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत आणि त्यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Criticized Sunil Tatkare
सुनील तटकरेंचे नेते अजित पवार नाहीत तर अमित शाह आहेत, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटल आहे. “सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नाही. त्यांचे नेते अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांचे नेते अमित शाह आहेत. अमित शाह नसते तर हा पक्षच फुटला नसता”, असंही राऊत म्हणालेत.
त्याचबरोबर “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांना आपण गृहमंत्री असल्याचे माहीत नाही. रोज नागपूर, मुंबई आणि राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. त्यानंतर गृहमंत्री कुठे दिसत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :