Eknath Shinde । राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून तापलेलं असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र एसंशि आणि युबीटी या दोन शब्दांवरुन शाब्दिक युद्ध सुरु आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा एसंशिं असा उल्लेख केला होता. यावर “मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो?”, असा सवाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
या दोन शब्दांवरुन राजकारण रंगलेले असताना अशातच आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. “उद्धव ठाकरे यांनी फेसबुक live करुन फेक नरेटीव पसरवले. ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, खुर्च्या बदलल्या तरी दिल बदलले नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोललो ते सर्व देणार आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. त्यांनी फेसबुक live करुन फेक नरेटीव पसरवले. ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत.” त्याचबरोबर “मी देखील FB म्हणजे फेवरेट भाऊ आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :