Anjali Damania । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत आणि त्यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संताप व्यक्त करत अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
2004 ते 2008 या काळात महाराष्ट्रात 72 हजार कोटींचा कथेत सिंचन घोटाळा झाला होता. मात्र 2012 मध्ये तो उघडकीस आला. डिसेंबर 2014 मध्ये अजित पवार सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याविरोधात या घोटाळ्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली होती. 20 डिसेंबर 2019 रोजी अजित पवारांना क्लीनचीट देण्यात आली होती. सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शाह जाणार असल्यामुळे अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Anjali Damania Criticized Amit Shah
“कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लम नाही. ७२,००० कोटी चा सिंचन घोटाळा आठवतो का ? त्याचे पुढे काय झाले ? काहीच नाही ना ? कारण आपलं थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार ? अतिउत्तम ! ED आणि ACB आता गुंडाळून टाका”, असं ट्विट करत अंजली दमानिया यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “त्यांच्या पैशावर नाचणारी महिला…”; Karuna Munde यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
- “मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक”; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणावरून Vijay Wadettiwar यांचा घणाघात
- “धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा…”; Karuna Munde यांचा खळबळजनक दावा