Share

एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेवर अजित पवारांकडून सावध भूमिका; म्हणाले..!

Ajit Pawar avoids comment on Eknath Shinde’s “Jai Gujarat” slogan, says he wasn’t present.

Published On: 

Ajit Pawar, sharad pawar | pune Pimpri Chinchwad Election

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिल्याने राज्यात राजकीय वादळ उठले आहे. विरोधकांकडून शिंदे यांच्यावर जोरदार टीका सुरू असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलणे टाळले आहे. “एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले, मला माहीत नाही,” असे वक्तव्य करत पवारांनी या वादातून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात सुरू असलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “जय गुजरात” चा नारा दिल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून या टीकेला प्रत्युत्तर दिले जात असले तरी, आता महायुतीतील महत्त्वाचे नेते अजित पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.

Ajit Pawar Comment on Eknath Shinde’s “Jai Gujarat” Slogan

या वादावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदे ज्यावेळी ‘जय गुजरात’ म्हणाले, तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो. ते नेमके काय म्हणाले, मला माहीत नाही.” मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, त्यामुळे ते नेमके काय म्हणाले याबाबतची माहिती मला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. “मी असेपर्यंत तरी तिथे असं काही झालं नव्हतं,” असेही ते म्हणाले.

पुढे पवार म्हणाले, “आपला देश हा अनेक जाती आणि धर्मांमध्ये विखुरला गेला आहे. अनेक भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपली मातृभाषा मराठी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही