🕒 1 min read
पुणे: मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा पेटलेला असताना, एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात दिलेल्या ‘जय गुजरात’ घोषणेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ नंतर थांबलेले शिंदे ( Eknath Shinde ) पुन्हा माईककडे गेले आणि ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली.
या घोषणेनंतर विरोधकांनी शिंदेंवर थेट ‘महाराष्ट्र द्रोह’ केल्याचा आरोप लावला आहे. शिंदेंच्या या घोषणेला निवडणुकीपूर्वी अमराठी मतांची खेच आणि मतदात्यांमध्ये आपली उपयुक्तता दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Eknath Shinde chants “Jai Gujarat”
एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांचे कौतुक करताना अनेक विशेषणे आणि उपमा वापरत होते. मात्र, या सगळ्याचा कळस भाषणाच्या शेवटी झाला. शिंदे यांनी “जय हिंद, जय महाराष्ट्र” असे म्हटल्यानंतर, त्यांना ( Eknath Shinde ) काहीतरी आठवले आणि त्यांनी पुन्हा माईकपाशी येऊन “जय गुजरात” असे म्हटले.
सुषमा अंधारे संतापल्या; ‘दिल्लीश्वरांचे पाय चाटण्याची स्पर्धा’
एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत अंधारे यांनी टीका केली.
अंधारे पुढे म्हणाल्या की, “ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळे बोलणे गरजेचे आहे.” जिथे राज्याचा माजी मुख्यमंत्री जय गुजरात म्हणतो, तिथे सुशील केडियासारख्या व्यक्तींनी “मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या?” हा उद्दामपणा त्यांच्यात येणे स्वाभाविक आहे. “जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसा वर्तन व्यवहार ठेवायचा, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल,” असे आवाहनही त्यांनी केले.
‘नो मराठी, नो व्होटिंग’चा ट्रेंड चालवणार!
भाजपने ज्या पद्धतीने ‘नो हिंदी नो बिझनेस’ असा ट्रेंड चालवला, त्याच धर्तीवर आता मराठी माणसाने ‘नो मराठी नो को-ऑपरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग’ हा ट्रेंड चालवावा लागणार आहे आणि तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे, असेही अंधारे यांनी ठणकावून सांगितले.
आव्हाडांनी घेतली चिमटा, ‘केम छो शिंदे साहेब?’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिवसेना ही मराठी माणसासाठी उभी राहिली होती. आणि आजचे माजी मुख्यमंत्री ‘जय गुजरात’ म्हणतात. हे विनाशकाले विपरीत बुद्धीचं लक्षण नाही का?”
‘जय गुजरात’ ही फक्त चूक नव्हे, तर गैरमराठी मतांना खूष करण्याचा जाणीवपूर्वक डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ठाणे-मीरारोडसारख्या अमराठी पट्ट्यांमध्ये निवडणुका तोंडावर असताना, तिथल्या मतांसाठीच शिंदेंनी हा संकेत दिल्याचं बोललं जात आहे. “ज्याला स्वतःच्या मातीत निष्ठा नाही, तो दुसऱ्याशी काय प्रामाणिक राहील?” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पिसाळलेल्या कुत्र्याला दगडं मारत नाहीत, बंदोबस्त करतात!; हसन मुश्रीफांचा हाकेंवर जोरदार हल्ला
- ब्रँड बाजारात असतो! नीलम गोऱ्हेंनी मनसेचे नेत्याला थेट ‘फुटकळ’ म्हटले!
- “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम!”; आदित्य ठाकरेंची रामदास कदमांवर खरमरीत टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












