🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी- शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
“ब्रँड म्हणजे बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी वापरला जाणारा शब्द आहे,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना त्यांनी थेट ‘फुटकळ’ असा उल्लेख करत लक्ष्य केलं.
Neelam Gorhe Slams Raj Thackeray MNS Leader
पत्रकार परिषदेत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, “लोकशाहीत मेळावे घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. सरकारने हिंदी सक्तीचा GR रद्द केला आहे आणि समितीही नेमली आहे. या सगळ्याचा अभ्यास न करता आंदोलन करणे गैर आहे. मराठी भाषिकांसाठी मेळावा घेतला जात असेल, अशी मी आशा करते. पण ‘ब्रँड’ ही संज्ञा बाजारातली असते, ती राजकारणात वापरणं योग्य नाही.”
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरही निलम गोऱ्हे यांनी खोचक टीका केली. “काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही असं म्हणणारे आहेत. मात्र ठाम भूमिकेने त्यांच्यासाठी संघर्ष करावा. काही ‘फुटकळ’ लोकांची दखल घेतली पाहिजे असे काही गरजेचे नाही,” अशा शब्दांत त्यांनी देशपांडेंना लक्ष्य केले.
मीरा-भाईंदरमध्ये व्यावसायिकांच्या मोर्चामागे भाजप असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गोऱ्हे म्हणाल्या, “कोण रसद पुरवतोय हे आधी पाहावं. राजकारण कधी-कधी आपल्या हिताचं नसतं.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम!”; आदित्य ठाकरेंची रामदास कदमांवर खरमरीत टीका
- ‘बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा; भाजपची कवितेतून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
- 7/12 कोरा करा, नाहीतर उलटं टांगू! शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now