🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी- हिंदी सक्तीचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने ५ जुलैला जाहीर केलेला मोर्चा मागे घेतला. त्याऐवजी आता विजयी मेळावा घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, या मेळाव्यावर भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत कवितेच्या माध्यमातून खोचक टोला लगावला आहे.
विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत सत्ताधाऱ्यांतर्फे बोलताना डॉ. फुके म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आलं होतं. त्यांच्या निर्णयालाच आता फडणवीसांनी रद्दबातल ठरवलं. त्यामुळे हा मोर्चा नव्हे, तर फडणवीसांचे आभार मानण्याचा मेळावा हवा होता.”
BJP MLA slams Thackeray brothers
यानंतर त्यांनी “बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा…” अशा ओळींनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
डॉ. फुके म्हणाले, “महायुती सरकारच्या सत्तेत आल्यापासून राज्यात विकासाला गती मिळाली आहे. मागील सहा-सात महिन्यांत महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडत आहेत.”
घरात आईला म्हणणार मम्मी
मोर्चामध्ये जाणार आम्ही,
कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण
मराठीचं करणार रक्षण,
सुट्टीसाठी आहे युरोप
दुसऱ्यांवर करणार आरोप
सत्तेसाठी वेगळे झालो
सत्तेसाठीच आता एकत्र आलो,
लाथाडले जनतेने
काय करतील कोण जाणे?
हिंदुत्वाचे कधी दुकान
कधी प्यारे टिपू सुलतान,
कास मराठीची धरली निवडणुकीत केम छो वरळी,
धारावीत दाखवला रुबाब,
लुंगी बहादूर छोटे नवाब,
भारत भर भाराभर चिंध्या
एक ना धड अस्तित्वाची धडपड,
बुडाखालून गेल्या खुर्च्या
म्हणून मराठीचा मोर्चा,
मोडीत कधीच निघाला ब्रँड आता चहूबाजूंनी वाजलाय बँड…
हिंदी सक्तीच्या निर्णयावरून ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाले होते. मात्र शासनाने तो निर्णय मागे घेतल्यानंतर आता राजकीय वातावरणात चढ-उतार सुरू आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- 7/12 कोरा करा, नाहीतर उलटं टांगू! शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा आक्रमक
- काठ्या चालवणाऱ्यांनी तलवार चालवणाऱ्यांना शिकवू नये; …तर कानाखाली बसेल; मनसेचा नितेश राणेंना करारा जवाब
- भाजपची ‘इमेज’ वाचवण्यासाठी फडणवीसांचा हस्तक्षेप; नाशिकच्या बागुल-राजवाडे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now