Share

काठ्या चालवणाऱ्यांनी तलवार चालवणाऱ्यांना शिकवू नये; …तर कानाखाली बसेल; मनसेचा नितेश राणेंना करारा जवाब

MNS Sandeep Deshpande slams Nitesh Rane

Published On: 

MNS hits back at Nitesh Rane; BJP worker quits over Marathi insult row.

मुंबई | प्रतिनिधी- भाजप आमदार नितेश राणे यांनी मनसेवर बोचरी टीका करत, “हिंमत असेल तर भेंडीबाजार, मोहम्मद अली रोडसारख्या भागात जाऊन टोपीवाल्यांना मारून दाखवा,” असं आव्हान दिलं. याला मनसेचे मुंबई विभागप्रमुख संदीप देशपांडे यांनी थेट शब्दांत जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

“रझा अकादमीच्या मोर्चात पोलिस भगिनींवर हल्ला झाला, तेव्हा फक्त मनसे रस्त्यावर उतरली होती. भाजपचे नेते तेव्हा कुठे होते? सगळे शेपटं घालून बसले होते,” असा घणाघात करत देशपांडे म्हणाले, “काठ्या चालवणाऱ्यांनी तलवार चालवणाऱ्यांना शिकवू नये.”

MNS hits back at Nitesh Rane

देशपांडे यांनी ट्विटरवरून भाजपला इशारा देताना म्हटलं, “व्यापारी आहात, व्यापार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला, तर कानाखाली बसेल. मेहता-बेहता आणि चड्डीत राहणं शिका,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये अमराठी दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर MNS आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढला आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी मनसेवर टीका केली होती. मात्र, या वादात भाजपचे मराठी कार्यकर्तेही नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.

पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर यांनी पक्षातून राजीनामा देत थेट मनसेत प्रवेश केला. यामुळे भाजपमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही