Share

भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादीत २०१४ पासून चार ते पाचवेळा चर्चा; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट!

NCP leader Sunil Tatkare claims his party discussed an alliance with BJP four-five times since 2014, revealing political secrets.

Published On: 

Sunil Tatkare denies talks of Sharad Pawar and Ajit Pawar reuniting, says “No proposal, no discussion.”

🕒 1 min read

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना २०१४ पासून भाजपसोबत युती करण्याबाबत चार ते पाच वेळा चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी जळगाव येथे केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अगोदर अजित पवारांनी हा दावा केला होता.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मेळाव्यासाठी आले असता, तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार गटाने भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन केले. “पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही आम्ही मूळ विचारधारा कायम ठेवत पुढील राजकीय वाटचाल कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे,” असे तटकरे म्हणाले.

तटकरे यांनी आपल्या दाव्याचे समर्थन करताना सांगितले की, ते प्रदेशाध्यक्ष असताना भाजपबरोबर सरकारमध्ये सामील होण्यासाठी एकदा नाही तर चार ते पाच वेळा चर्चा झाली होती.

Sunil Tatkare reveals NCP-BJP alliance talks since 2014

२०१४: “मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे विश्वासदर्शक ठरावही पारित झाला होता.”

२०१६-२०१७: “२०१६-२०१७ मध्येही आम्ही भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी होणार होतो, त्यादृष्टीने लोकसभेचे जागा वाटप देखील झाले होते. मी प्रदेशाध्यक्ष असल्याने सर्व वाटाघाटी करत होतो. त्यावेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि आम्ही सरकारमध्ये जाऊ, असे आम्हाला अपेक्षित होते. मात्र, शिवसेना सरकारमध्येच राहील, असे भाजपने ठामपणे सांगितले.”

२०१९: “२०१९ मध्येही सरकारमध्ये जाण्याची चर्चा दोन्हीकडे सुरू होती. भाजपकडूनही त्यासाठी पाऊले उचलली गेली होती. पण पुढे निर्णय झालाच नाही,” असेही तटकरे यांनी नमूद केले.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना तटकरे म्हणाले, “राजकीय ध्रुवीकरण सातत्याने घडत असते. २०१९ ते २०२४ या कालावधीत जितके राजकीय ध्रुवीकरण झाले तेवढे कधीच झाले नव्हते. आता यापुढे काय काय होते ते बघायचे आहे.”

अजित पवार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना तटकरे म्हणाले की, “पक्षाचा अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांनी विविध घटकांना बरोबर घेतले आहे. विविध समाज घटकांना मंत्रीपद देत न्याय दिला आहे. ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे नेते आहेत, याचा मला अभिमान आहे. त्यांच्यावर टीका करणारे लोक दखलपात्र नाहीत,” असे म्हणत त्यांनी लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवरील केलेली टीका फेटाळून लावली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या