Share

“इंग्रजीशिवाय समजतच नसेल, तर अशांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा”; मुनगंटीवारांचा ‘इंग्रजी’वरून गदारोळ

BJP MLA Sudhir Mungantiwar lashes out over English in Assembly

Published On: 

BJP MLA Sudhir Mungantiwar lashes out over English in Assembly, targets energy department.

🕒 1 min read

पुणे: विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडील ऊर्जा खात्याच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर, सभागृहातील कामकाज इंग्रजी भाषेतून चालवण्यावर आणि कार्यक्रमपत्रिका इंग्रजीतून देण्यावर तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरले. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली.

मुनगंटीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा कामकाजाची कार्यक्रमपत्रिका इंग्रजी भाषेतून दिल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. “महाराष्ट्र विधानसभा नियमांमध्ये कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत चालेल अशी तरतूद असली तरी, मी १९९५ पासून या सभागृहात आहे, पण कार्यक्रमपत्रिका इंग्रजीत बघितली नाही,” असे मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) म्हणाले. समोरच्या बाकांवरून “पहिल्यापासून हे आहे,” असे उत्तर येताच, त्यांनी त्यांनाच सुनावले.

Sudhir Mungantiwar Targets English in Assembly

“ऐकून तर घ्या ना! पहिल्यापासून आहे म्हणजे काय? सनदी अधिकाऱ्यांना आपण मराठी शिकवतो, इकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा म्हणतो आणि ज्यांना मराठी येत नाही, त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी वापरायला सांगायचं? मग हिंदीतच बोला ना, कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्या! हिंदीच्या सक्तीला विरोध करायचा आणि इंग्रजीवर प्रेम दाखवायचं? इंग्रजीला आलिंगन द्यायचं? माझा याला तीव्र आक्षेप आहे,” अशा शब्दांत मुनगंटीवारांनी आपला संताप व्यक्त केला.

मुनगंटीवार इथेच थांबले नाहीत. त्यांनी विधानसभा नियमावलीतूनच इंग्रजी शब्द काढून टाकण्याची मागणी केली. “महाराष्ट्र विधानसभा नियम तयार करताना इंग्रजीचा प्रभाव असेल. माझी विनंती आहे की, एकदा नियम समितीची बैठक घ्यावी आणि इंग्रजी शब्द जिथे जिथे असेल तो तिथून काढून टाकावा. मराठी शिकलीच पाहिजे, ती आपली अभिजात भाषा आहे. समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी पर्याय आहे, पण फारच इंग्रजीशिवाय समजत नसेल तर पासपोर्ट-व्हिसा काढून अशांना थेट ब्रिटनच्या संसदेत पाठवा. ही काय पद्धत आहे?” असे मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) संतापून म्हणाले.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी मिश्किल टिप्पणी केली. “सुधीरभाऊ, माध्यमांना हिंदी आणि मराठीबद्दल लिहायला खूप काही आहे. आता तुम्ही त्यात इंग्रजीची भर घालू नका,” असे म्हणताच सभागृहात हास्याची लहर आली.

नार्वेकर यांनी मुनगंटीवार यांची मागणी फेटाळून लावताना स्पष्ट केले की, नियम २२ नुसार सभागृहात कोणत्या भाषेत चर्चा करता येते हे सर्वांना माहिती आहे. त्याप्रमाणे, सुरुवातीपासून इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये कामकाज पत्रिका तयार केली जाते. शिवाय, त्यांच्याकडे कामकाज पत्रिका इंग्रजीत देण्यात यावी अशी ८ सदस्यांची अधिकृत विनंतीही आली असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले. यामुळे, मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांची मागणी फेटाळण्यात आली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही