🕒 1 min read
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओबीसी समाज वाळीत टाकेल, असा गंभीर इशारा दिला आहे. ‘महाज्योती’ संस्थेसाठी निधी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी शिष्यवृत्तीच्या मागणीकडे अजित पवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाच्या या मागण्या प्रलंबित असतानाही राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार एकही शब्द बोलायला तयार नाहीत, असे हाके म्हणाले. या सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरही येते, असे सांगत, ज्यांना विरोध म्हणून तुम्हाला सत्तेत आणले, आता तीच मंडळी ( Ajit Pawar) पुन्हा ओबीसींच्या टाळूवरील लोणी खाण्यात व्यस्त असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना समजावून सांगावे, अन्यथा येत्या काळात ‘महाज्योती’च्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हाके यांनी दिला आहे.
Ajit Pawar Accused of Bribing Voters in Sugar Mill Election
माळेगाव विजयामागे पैशांचा वापर? हाकेंचा खळबळजनक दावा
अलीकडेच झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी मोठा विजय मिळवला होता. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लक्ष्मण हाके यांनी खळबळजनक दावा केला आहे. “माळेगावचा विजय हा अजित पवारांचा नसून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रिपदाचा आहे,” असे हाके म्हणाले. सभासदांना मतदानासाठी २० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मी त्या भागात फिरलो आहे आणि लोकांनी मला सांगितले की कोणाच्या खात्यात कसे पैसे आले, कुठून आले आणि कोणी दिले, याच्या चर्चा सुरू आहेत,” असेही हाके यांनी सांगितले.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माळेगावच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी, कारण तिथे त्यांची ( Ajit Pawar) गरज आहे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. पैसा आणि सत्तेचे राजकारण हे पवार कुटुंबाचे धोरण आहे, असा आरोपही हाके यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मराठी में बोल’ म्हणत MNS कार्यकर्त्यांकडून हॉटेल मालकाला मारहाण; स्वतः हिंदीतच केली आरडाओरड
- फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जोरदार पलटवार; “मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाच्या बापातही नाही!”
- हिंदीचा आम्हाला अभिमान; इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now