Share

‘मराठी में बोल’ म्हणत MNS कार्यकर्त्यांकडून हॉटेल मालकाला मारहाण; स्वतः हिंदीतच केली आरडाओरड

MNS workers beat up restaurant owner in Mira Road for not speaking Marathi.

Published On: 

Viral video shows MNS workers assaulting a restaurant owner in Mira Road for not speaking Marathi, sparking outrage on social media

मुंबई, महाराष्ट्र: मुंबईजवळील मीरा रोड येथे मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी एका हॉटेल मालकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ‘मराठीत बोल’ असे हिंदीतून बजावत या कार्यकर्त्यांनी मालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित हॉटेल मालकाला काही प्रश्न विचारले. मात्र, तो मराठीत बोलत नसल्याने त्याला मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये दिसते की, मारहाण होत असताना हॉटेल मालक नम्रपणे “मला माहित नाही की मराठी सक्तीची आहे. मला कोणीतरी मराठी भाषा शिकवा, मी मराठीत बोलेन,” असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यावर चिडून, “हा महाराष्ट्र आहे, मग तुला मराठीतच बोलावं लागेल”, असे म्हणत कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, हे सर्व कार्यकर्ते स्वतः हिंदी भाषेतच ‘मराठी में बोल’ असे ओरडत होते.

MNS Worker Assault Restaurant Owner

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मनसेचे कार्यकर्ते त्या हॉटेल मालकाला विचारताना दिसतात की, “तू महाराष्ट्रात कुठली भाषा बोलली पाहिजे?” यावर तो मालक “महाराष्ट्रात सगळ्या भाषा बोलल्या जातात,” असे उत्तर देतो. हे ऐकताच संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला कानशिलात लगावली आणि इतरही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने “ही कानशिलात त्या व्यक्तीला नाही तर यंत्रणेला आहे,” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युझरने “उत्तर भारतीयांना मुंबईत मारहाण केली जाते आहे, कारवाई कधी होणार?” असा प्रश्न विचारला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेवरून होणारे राजकारण आणि त्याचे समाजात उमटणारे पडसाद यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install