Share

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून यूट्युबरकडून फसवणूक; संजय विश्वकर्मा गजाआड

YouTuber arrested for duping youth with fake overseas job offers.

Published On: 

YouTuber Sanjay Vishwakarma Arrested for Overseas Job Fraud

🕒 1 min read

मुंबई: परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो होतकरू तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका यूट्यूब चॅनेल चालकाला ( YouTuber ) मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. संजय विश्वकर्मा (३३) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात मुंबई, मीरा-भाईंदर, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये असे एकूण चार फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीचा मुख्य सूत्रधार असलेला हा यूट्यूबर आपल्या चॅनेलवर आकर्षक व्हिडिओ अपलोड करून तरुणांना जाळ्यात ओढत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय विश्वकर्मा हा त्याच्या साथीदारांसह ‘व्हिसा एक्स्पर्ट मॅनपाॅवर’ नावाचे यूट्यूब चॅनेल चालवत होता. या चॅनेलवर तो परदेशातील नोकरीच्या संधींबाबत व्हिडिओ अपलोड करायचा आणि संपर्कासाठी दोन मोबाईल नंबर देत असे. या नंबरवर संपर्क साधणाऱ्या गरजू तरुणांना तो हेरून फसवणूक करत होता.

YouTuber Sanjay Vishwakarma Arrested

मोहम्मद हसन गुलाम रसुल, त्यांचा मुलगा आसिफ आणि जावई मुनावर शेख यांना वर्क व्हिसावर परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून संजय विश्वकर्मा आणि त्याचा साथीदार अब्दुल्ला हुसेन आलम शेख यांनी तब्बल ४ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी रसुल यांच्या तक्रारीवरून चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा कक्ष-५ च्या पथकाने या तपासादरम्यान प्रथम अब्दुल्लाला अटक करून चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विश्वकर्मा पोलिसांनी ठावठिकाणा शोधून काढला. वसईमधील नायगाव येथून त्याला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली असून, पुढील तपासासाठी त्याला चारकोप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आरोपी संजय विश्वकर्मा ( YouTuber ) हा बनावट नावाने यूट्यूबवर सक्रिय होता. त्याच्या ‘व्हिसा एक्स्पर्ट मॅनपाॅवर’ या यूट्यूब चॅनेलवर ६ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. महत्त्वाचे म्हणजे, तो परदेशात तरुणांना पाठवत असतानाचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ चॅनेलवर टाकत असे. यामुळे अनेकांना त्याच्यावर विश्वास बसला आणि ते त्याच्या जाळ्यात ओढले गेले.

संजय विश्वकर्मा याच्याविरोधात भाईंदर येथील नवघर, राजस्थानातील सदर नागौर पोलीस ठाणे आणि हरियाणातील सदर पोलीस ठाण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने विविध राज्यातील १५ हून अधिक बेरोजगार तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत आणि फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या