Share

गृहराज्यमंत्र्यांवर वाळू चोरीचा गंभीर आरोप; अनिल परब म्हणाले, “पुरावे देतो, हिंमत असेल तर कारवाई करा!

MLA Anil Parab alleges sand theft by Maharashtra Home Minister Yogesh Kadam, claims to have proofs, challenges action.

Published On: 

Anil Parab accuses Maharashtra Home Minister of sand theft, claims proof in Assembly.

🕒 1 min read

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एका नव्या वादंगाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी थेट राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरीचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. परब यांनी या आरोपासाठी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा करत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यावर कारवाई करण्याचे खुले आव्हान दिले आहे.

विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी महसूल राज्यमंत्र्यांवर वाळू चोरीची पाच प्रकरणे असल्याचं नमूद केलं. परब म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोलिसांना निलंबित करण्याचे अधिकार आहेत. कुठल्याही लोकसेवकाने गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाई करता येते. आमदार, मंत्री हे लोकसेवकाच्या व्याख्येत बसतात.”

Anil Parab alleges sand theft by Yogesh Kadam

परब यांनी थेट बावनकुळे यांना उद्देशून सांगितले की, “महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडल्याची मी पाच प्रकरणं तुम्हाला पुढील तीन दिवसांत देतो आणि पुरावेही सादर करतो. त्यांच्यावर कारवाई करून हे राज्य सरकार कणखरपणा दाखवणार आहे का?” या प्रश्नाने सभागृहात एकच खळबळ उडवून दिली.

आपल्या भाषणात अनिल परब यांनी महसूल राज्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली. ती वाळू तुमच्या सरकारच्या धोरणाप्रमाणे तहसीलदाराकडे द्यायला हवी होती. त्यापैकी पाच ब्रास वाळू गरिबांना द्यायला पाहिजे होती. मात्र, इथे तसं झालं नाही,” असे परब यांनी नमूद केले.

यावर त्यांनी बावनकुळे यांना आव्हान दिले, “जी ताकद, जी हिंमत एक कणखर महसूलमंत्री तलाठी, तहसीलदार व आरटीओ अधिकाऱ्यांच्या बाबतीत दाखवतात, ती हिंमत महसूल राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवतील का?”

परब यांनी आपल्या मागणीवर जोर देत म्हटले, “महसूल मंत्र्यांनी संबंधित ठिकाणाला भेट दिल्याचे पुरावे, तिथल्या नोंदी व अहवालांची कॉपी मी सभागृहाला देतो. त्यानंतर महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित कराल का? त्यावेळी हिंमत दाखवाल का? माझा महसूल मंत्र्यांना प्रश्न आहे की आमच्यावर कारवाई करताना जी हिंमत दाखवता ती राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवाल का? छोटी चिलटं मारू नका, मोठा गडी मारा. असं केल्यास आम्ही तुमच्या हिमतीची दाद देऊ. तुम्ही ताकदवान नेते आहात असं मानू. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.”

अनिल परबांच्या या गंभीर आरोपांमुळे आणि आव्हानामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या आरोपांवर सरकार काय भूमिका घेते आणि महसूल मंत्री बावनकुळे अनिल परबांनी दिलेले पुरावे स्वीकारून कारवाई करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही