🕒 1 min read
मुंबई: नाना पटोले यांच्या एक दिवसाच्या निलंबनानंतर त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. पटोले यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी एक दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी घटना असून, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदाराचे निलंबन झाल्याबद्दल विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल की, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवमानाविरोधात बोलल्यामुळे कुणालातरी निलंबित करण्यात आले आहे. हा एक अत्यंत भयानक पायंडा आजच्या सरकारने पाडला आहे.”
Aditya Thackeray criticizes Devendra Fadnavis
ठाकरे यांनी पुढे बोलताना सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. “महाराष्ट्राचे दुर्दैव हे आहे की हे सरकार शेतकऱ्यांचे नसून, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावर बसलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचने न पाळता, त्यांचा अपमान करून यांना सत्ताधारी बाकांवर बसता येते, हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवून दिले आहे,” असे गंभीर आरोप त्यांनी ( Aditya Thackeray ) केले.
नाना पटोले यांच्या निलंबनाचा निषेध म्हणून आज एक दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे,” असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. या बहिष्कारामुळे विधानसभेतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा वाद आता आमदारांच्या निलंबनापर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे अधिवेशनातील पुढील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मोदी तुमचा बाप असेल…” विधानसभेत धुमाकूळ! नाना पटोलेंना अखेर निलंबित केलंच!
- पडळकर अडचणीत? जालन्यात हजारो ख्रिश्चन रस्त्यावर; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!
- खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण: ७ दिवसांत ३२४० रुपयांनी घट, प्रमुख ५ कारणे समोर