Share

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जोरदार पलटवार; “मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाच्या बापातही नाही!”

Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray, says “No one can separate Mumbai from Maharashtra.”

Published On: 

Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray, says "No one can separate Mumbai from Maharashtra."

🕒 1 min read

मुंबई, महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात जुंपली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात दोन शासन निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ‘अफवांची फॅक्टरी’ असल्याची टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले. फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केवळ टीकेला प्रत्युत्तर दिले नाही, तर मुंबईच्या विकासावरून आणि मराठी माणसाच्या हितावरूनही ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून थांबलेली नाही. लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीने यांनी एक यश मिळवलं, पण विधानसभेला आपण त्यांना थेट नरेटिव्हने उत्तर दिलं. आता महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, आता महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरु झाला आहे. अशी भाषणं आता ऐकायला मिळणार आहेत. तुमच्यातही ही ताकद नाही आणि कुणाच्या बापामध्ये ही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकाल,” असे ठामपणे सांगत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray

फडणवीसांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरही गंभीर आरोप केले. त्यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हटले की, “भाजपाचं सरकार आल्यानंतर मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला. मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजून तुम्ही अंडी खात राहिलात आणि शेवटी ती कोंबडी चिरण्याचं कामही तुम्ही केलंत.” मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या फायद्यासाठी महानगरपालिकेचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.

“मुंबईतल्या मराठी माणसाला, गिरगावातल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम ठाकरेंनी केलं. तुम्ही केवळ मराठीच्या नावावर राजकारण करत राहिलात.” मराठी माणसाला घरे देण्याचे काम आपल्या सरकारने केले असल्याचे सांगत त्यांनी अभ्युदय नगर आणि बीडीडी चाळीतील पुनर्वसनाचे उदाहरण दिले. “मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो,” असे म्हणत त्यांनी (Devendra Fadnavis) निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांसाठी राजकारण करत असल्याचा आरोप केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या