🕒 1 min read
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ‘महाज्योती’ संस्थेच्या निधी आणि पीएचडी शिष्यवृत्तीच्या प्रलंबित मागणीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओबीसी समाज वाळीत टाकेल, असा गंभीर इशारा दिला आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे, ज्यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाच्या या मागण्या प्रलंबित असतानाही, राज्याचे अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी यावर अद्याप एकही शब्द उच्चारलेला नाही, असे हाके यांनी म्हटले आहे. त्यांनी या परिस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांनाही जबाबदार धरले आहे. “ज्यांना विरोध म्हणून सत्तेत आणले, तीच मंडळी पुन्हा ओबीसींच्या टाळूवरील लोणी खाण्यात व्यस्त आहेत,” असा उपरोधिक टोलाही हाके यांनी लगावला.
Laxman Hake warns Ajit Pawar NCP
हाके यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी अजित पवारांना यासंदर्भात समजावून सांगावे. अन्यथा, येत्या काळात ‘महाज्योती’च्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माळेगावच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी, अशी मागणी केली आहे. “पैसा आणि सत्तेचे राजकारण हे पवार कुटुंबाचे धोरण आहे,” असा थेट आरोपही हाके यांनी यावेळी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत २० हजार ते १ लाख रुपये वाटले!”; अजित पवारांवर हाकेंचा गंभीर आरोप”
- ‘मराठी में बोल’ म्हणत MNS कार्यकर्त्यांकडून हॉटेल मालकाला मारहाण; स्वतः हिंदीतच केली आरडाओरड
- फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जोरदार पलटवार; “मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाच्या बापातही नाही!”