🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पुण्यात मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये राहणाऱ्या केदार सोमण नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट केली होती. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार सोमण यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्यासह अनेक कार्यकर्ते सोमण यांच्या घरी जाब विचारण्यासाठी पोहोचले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
Offensive post against Raj Thackeray
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीबाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी केदार सोमण यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मनसे कार्यकर्त्यांनी सोमण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
यावर मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सांगितले की, “केदार सोमण नावाच्या व्यक्तीने राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन पोस्ट केली होती. आम्ही त्याचा शोध घेतला असता, सुरुवातीला तो ठाण्यात राहत असल्याचे समजले, पण नंतर तो पुण्यात, कोथरूडमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले.” संभूस पुढे म्हणाले, “आम्ही त्याला ‘चोप’ देण्यासाठीच आलो होतो, पण पोलीस आल्यामुळे तो वाचला. मात्र, आम्ही त्याला सोडणार नाही.”
केदार सोमण यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, “रात्री हाल्फ खांबा मारून झाल्यावर राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा, तू मेरा भाई है (उठा रात्री पण घरीच बसून वाईन वाईन प्यायचा, घराबाहेर न पाडण्याचे व्रत, अखंड होते).” या पोस्टमुळेच मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘नारायण राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणी संजय राऊतांची मागणी
- “इंग्रजीशिवाय समजतच नसेल, तर अशांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा”; मुनगंटीवारांचा ‘इंग्रजी’वरून गदारोळ
- लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना ‘बहिष्कारा’चा इशारा; ‘महाज्योती’च्या निधीवरून राजकीय रणकंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now