Share

‘नारायण राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणी संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut demands apology from Rane’s son after Mumbai Police report on Disha Salian.

Published On: 

Sanjay Raut demands apology from Rane's son after Mumbai Police report on Disha Salian

🕒 1 min read

मुंबई: दिशा सालियन प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा केला आहे. या अहवालानंतर संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नारायण राणे यांच्या मुलाने ‘नाक घासून माफी मागावी’ अशी मागणी करत, आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

मुंबई पोलिसांच्या अहवालावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “पोलीस आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही. आपणच ती स्थापन केली होती. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. शेवटी सत्य समोर येत आहे,” असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut demands apology from Rane and Devendra Fadnavis

या प्रकरणी ज्यांनी आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माफी मागावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. “सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणे यांचा मंत्री असलेल्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे. ज्यांनी बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

दिशा सालियन प्रकरण काय आहे?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं, मात्र या प्रकरणात काही राजकीय नेत्यांनी दिशावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि तिची हत्या झाल्याचे आरोप केले होते. या आरोपांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Crime Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या