Share

7/12 कोरा करा, नाहीतर उलटं टांगू! शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा आक्रमक

Bachchu Kadu warns government: No loan waiver, no recovery

Published On: 

Bachchu Kadu threatens government over farmer loan waiver, protests in Mumbai today.

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफी, वीजबिल माफी आणि सातबारा (7/12) कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतानाच सरकारला थेट इशारा दिला आहे.

“7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत वसुली नाही. अन्यथा सरकारला उलटं टांगू,” असा घणाघात करत कडू यांनी आज मुंबईत आंदोलनाची हाक दिली. यापूर्वी जून महिन्यातही त्यांनी याच मागणीसाठी आंदोलन केलं होतं.

Bachchu Kadu demands 7/12 clearance

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना करण्याचे कर्जमाफी आश्‍वासन दिले होते. मात्र अद्याप कर्जमाफी झाली नसल्याने कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. समिती स्थापनेचं आश्वासन देत त्यांचं उपोषण थांबवण्यात आलं होतं.

मात्र यामध्ये होत असलेली दिरंगाई पाहता कडू यांनी पुन्हा 7 जुलैपासून पदयात्रा काढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, शेतकरी आत्महत्यांचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. मार्च ते मे 2025 या कालावधीत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अधिकृत अहवाल सरकारने सादर केला आहे.

विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत हे प्रमाण चिंताजनक आहे. लातूर, अकोला, यवतमाळ, बीड, नांदेड आणि अमरावती हे सर्वाधिक प्रभावित जिल्हे ठरले आहेत.

नापिकी, कर्जाचा ताण, विमा कंपन्यांची उदासीनता आणि शासनाची ढिसाळ मदत योजना ही आत्महत्यांच्या मुळाशी असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समितीची घोषणा केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या