Share

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?

राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी, जाचक अटींमुळे १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांवर समाधान मानावे लागणार आहे.

Published On: 

Farmer Loan Waiver - Disappointed Maharashtra farmers waiting for full debt relief.

निवडणुकीच्या तोंडावर दिलेली दोन लाखांची कर्जमाफी (Farmer Loan Waiver) खरंच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे, की हा फक्त एक राजकीय जुमला आहे? राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ला कॅबिनेटमध्ये मंजुरी तर दिली, पण यातील अटी पाहून बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालंय.

सरकारच्या दाव्यानुसार तब्बल ५५ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. यासाठी ३६ हजार कोटींची मोठी तरतूदही करण्यात आलीय. कालच या संदर्भातला शासन निर्णय धडकला. मात्र, आतली आकडेवारी आणि नियम वाचल्यावर अनेक शेतकरी नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Farmer Loan Waiver Scheme

सर्वात मोठा फटका बसलाय तो महाविकास आघाडीच्या काळात कर्जमाफी घेतलेल्यांना. २०१९ मध्ये ज्यांनी कर्जमाफी घेतली, पण आता पुन्हा थकीत आहेत, त्यांना केवळ ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्याभरात असे तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी आहेत, ज्यांच्या पदरात सरकारने एकप्रकारे निराशाच टाकली आहे.

दुसरीकडे, जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यासाठीही अटींचा डोंगर उभा केलाय. नियमित कर्जदारांना ५० हजारांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, पण त्यासाठी सलग दोन वर्षे कर्ज भरणं बंधनकारक आहे. त्यामुळे जुन्या योजनेचा लाभ घेतलेल्यांना आता दुजाभाव का, असा संतप्त सवाल विचारला जातोय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात दोन लाखांच्या आत थकीत असलेल्या केवळ १६ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा १०० टक्के फायदा होईल.

तसंच, ज्यांच्यावर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे, अशा २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना आधी वरची रक्कम भरावी लागेल, तेव्हाच ते पात्र ठरतील. त्यामुळे हा केवळ कर्जमाफीचा खुळखुळा असल्याचा आरोप आता होऊ लागलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही