Share

अमेरिकेचा मोठा निर्णय! इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाची घोषणा, पण हिजबुल्लाह गप्प बसणार का?

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये अखेर युद्धविरामाची घोषणा झाली असून, हिजबुल्लाहला सीमेवरून माघार घेण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

Published On: 

Israel Lebanon Ceasefire - US mediates peace agreement between Israel and Lebanon.

🕒 1 min read

मध्यपूर्वेत भडकलेला युद्धाचा भडका अखेर शांत होणार की पुन्हा एखादा नवा स्फोट होणार? सलग कित्येक महिने लेबनॉनवर बाँबचा पाऊस पाडणाऱ्या इस्रायलने अचानक एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या आहेत.

लेबनॉनला अक्षरशः बेचिराख करण्यावर इस्रायल ठाम होता. पण इराणने दिलेला सज्जड दम आणि अमेरिकेसोबतची चर्चा थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. अखेर अमेरिकेच्या दबावासमोर झुकत इस्रायलने लेबनॉनसोबत (Israel Lebanon Ceasefire) युद्धविरामाची अधिकृत घोषणा केली आहे.

Israel Lebanon Ceasefire

वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाच्या बैठकीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण या ऐतिहासिक करारात मोठी खळबळ उडवून देणारी गोष्ट म्हणजे, ज्या हिजबुल्लाहविरुद्ध (Hezbollah News) इस्रायलने रणशिंग फुंकले होते, त्यांचा एकही नेता या बैठकीला हजर नव्हता.

लेबनॉनने थेट इस्रायलसोबत हा करार केला असला तरी, याचा सर्वात मोठा फटका हिजबुल्लाहलाच बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहला कोणत्याही परिस्थितीत तात्काळ गोळीबार थांबवावा लागणार आहे. त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

याशिवाय, लिटानी नदीच्या खोऱ्यातून हिजबुल्लाहच्या सैनिकांना पूर्णपणे माघार घ्यावी लागेल. त्या संपूर्ण संवेदनशील भागात आता केवळ लेबनानच्या अधिकृत लष्कराचे जवान तैनात असतील. तिथे हिजबुल्लाहच्या अस्तित्वाला आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दक्षिण लेबनॉनमध्ये एक ‘स्पेशल पायलट सिक्युरिटी झोन’ उभारला जाणार आहे. या भागाची संपूर्ण सूत्रे लेबनाननी सैन्याच्या हातात असतील. त्यामुळे सीमेवर आता शांतता राखण्याची जबाबदारी याच सैन्यावर असेल.

याआधीही अनेकदा युद्धविरामाची चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी इस्रायलने कोणाचेही न ऐकता आपले प्राणघातक हल्ले सुरूच ठेवले होते. या एकतर्फी हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा संताप व्यक्त केला जात होता.

त्यामुळेच अमेरिकेने अखेर कठोर भूमिका घेत इस्रायलला खडे बोल सुनावले. अमेरिकेच्या या मध्यस्थीला आता मोठं यश आलं असून, या युद्धविरामामुळे मध्यपूर्वेतील राजकारण कोणत्या दिशेने जातं, हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!