Share

मॅनफोर्सला युद्धाचा फटका; पेट्रोल-डिझेल नाही, तर आता चक्क कंडोमही होणार महाग!

आखाती देशांमधील युद्ध आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा मोठा फटका उत्पादकांना बसण्याची शक्यता असून, लवकरच भारतात कंडोमचे दर वाढू शकतात.

Published On: 

Condom Price Hike: युद्धाचा फटका, आता कंडोमही महागणार?

जगात कुठेही युद्ध भडकलं, तरी त्याचे चटके सर्वसामान्यांच्या खिशाला बसतातच. पण आता पेट्रोल-डिझेल, सोनं किंवा किराणा नाही, तर चक्क आणखी एका अनपेक्षित गोष्टीला महागाईची झळ बसणार आहे. होय, आता बाजारात कंडोम खरेदी करणंही खिशाला जड जाऊ शकतं.

आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या भयंकर संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

Condom Price Hike

याचा थेट फटका आता देशातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी मॅनकाईंड फार्मा (Mankind Pharma) यांना बसू लागला आहे. भारतीय बाजारात मॅनफोर्स ब्रँडचा चक्क ३० टक्के मोठा वाटा आहे.

फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली असून ते १०० डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहोचले आहे.

कंडोम तयार करण्यासाठी लागणारी खास रसायने, लुब्रिकेंट आणि पॅकेजिंगचे साहित्य पेट्रोलियम पदार्थांवर अवलंबून असते. कच्चे तेल महागल्याने आता Condom Price Hike ची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मॅनकाईंड फार्माच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल अरोडा यांनी या वाढत्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडे सध्या काही दिवसांचा साठा उपलब्ध आहे. पण जर हा भूराजकीय तणाव असाच राहिला, तर उत्पादन खर्चात मोठी वाढ होईल आणि दरवाढीशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही अडचण फक्त भारतापुरती मर्यादित नाही. सूत्रांनुसार, जगातील सर्वात मोठी मलेशियन कंडोम उत्पादक कंपनी ‘कॅरेक्स’ (Karex) ने देखील आपले दर २० ते ३० टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या १०० ते १५० रुपयांना मिळणाऱ्या १० कंडोमच्या पॅकेटसाठी ग्राहकांना लवकरच जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install