Share

काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प? राघव शास्त्रीला अमेरिकेत आला थेट स्वामींचा फोन अन् ‘देऊळ बंद ३’ ची मोठी घोषणा!

‘देऊळ बंद २’ चित्रपटात राघव शास्त्री अर्थात गश्मीर महाजनीची धमाकेदार एन्ट्री झाली असून, अमेरिकेत त्याला थेट स्वामींचा फोन आल्याच्या भन्नाट सीनसह आता ‘देऊळ बंद ३’ची घोषणा करण्यात आली आहे.

Published On: 

Deool Band 3 Announced: गश्मीरच्या भन्नाट एन्ट्रीने खळबळ!

मराठी सिनेसृष्टीत कधी कोणता धक्का बसेल सांगता येत नाही, याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. तब्बल ११ वर्षांनी प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित ‘देऊळ बंद २’ थिएटरमध्ये धडकला आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजावाजा करतोय.

पण या चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांना एक असं सरप्राईज मिळालंय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. २०१५ मध्ये ‘देऊळ बंद’मधून राघव शास्त्री म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आता थेट अमेरिकेत पोहोचलाय.

Deool Band 3 Announced

सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील एका सीनची क्लिप तुफान व्हायरल होत आहे. यात अमेरिकेत असलेल्या राघवला चक्क स्वामी समर्थांचा फोन येतो. फोन उचलताच स्वामी म्हणतात, “मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय, तुला मी आठवतोय का?” हे ऐकून राघव अवाक् होतो आणि त्याच्या तोंडून ‘ओह माय गॉड’ असे उद्गार निघतात.

त्यावर स्वामी त्याला, “येस माय डार्लिंग, आय एम युअर गॉडच. काय म्हणतेय तुझी अमेरिका, काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प?” असा भन्नाट सवाल करतात. या एकाच डायलॉगवर थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होत आहे.

गश्मीरच्या याच धमाकेदार एन्ट्रीसोबत आता अधिकृतपणे ‘देऊळ बंद ३’ (Deool Band 3) ची मोठी घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ ची धुरा दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे.

यात त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत असून, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत जीव ओतला आहे. या भागात शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्यावरील आर्थिक संकटासारखे ज्वलंत प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. आता तिसऱ्या भागात राघव शास्त्री आणि स्वामींची ही जुगलबंदी आणखी काय कमाल करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install