🕒 1 min read
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम होतो, हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत आदित्य ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे.
रामदास कदम यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला. याच आरोपांना उत्तर देताना आदित्य ठाकरे आक्रमक झाले.
Aaditya Thackeray Slams Ramdas Kadam Over Raj Insult claims
आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, “ज्या व्यक्तीचा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्यानंतर देखील विधानपरिषद दिली, मंत्रीपदे दिली, पण तरीही ते पळून गेले. त्या व्यक्तींवर मी ( Aaditya Thackeray ) आता बोलू इच्छित नाही.”
रामदास कदम हे शिवसेनेच्या स्थापनेपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. तेव्हापासून ठाकरे गट आणि रामदास कदम यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा; भाजपची कवितेतून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
- 7/12 कोरा करा, नाहीतर उलटं टांगू! शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा आक्रमक
- काठ्या चालवणाऱ्यांनी तलवार चालवणाऱ्यांना शिकवू नये; …तर कानाखाली बसेल; मनसेचा नितेश राणेंना करारा जवाब