🕒 1 min read
कोल्हापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हाकेंच्या टीकेचा मुद्दा येताच, पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा देत आपला संताप व्यक्त केला आहे. “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो. पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करायचा असतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
Hasan Mushrif compares Laxman Hake to a mad dog
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून रद्द करण्यासंदर्भात अधिसूचना निवडणुकीपूर्वीच रद्द केली होती. कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गाबाबत भूमी संपादनाची रद्द झालेली प्रक्रिया पुनर्स्थापित करण्याच्या मुद्द्याला मी आणि आमदार आबिटकर यांनी विरोध केला होता. चंदगडमधून जर तो महामार्ग जायला शेतकऱ्यांचा विरोध नसेल, तर तो देखील मार्ग अवलंबायला काय हरकत नाही, असे सूचक विधानही मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी केले.
ठाकरे बंधूवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “एका कुटुंबातील दोन भाऊ जर एकत्र येत असतील, तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. उद्याच्या मेळाव्याला सुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. राजकारणात काय बदल होतात, हे नंतर निवडणुकीत जनता ठरवेल,” असे मुश्रीफ म्हणाले.
मनसेचं कौतुक वाटतं – अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, “मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (मनसे) कौतुक वाटतं. एका व्यक्तीने राज ठाकरे यांच्यावर पोस्ट लिहिली, तर त्याला अद्दल घडवण्याचं काम मनसे कार्यकर्त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी बोललं, तर पूर्ण भाजप तुटून पडते. परंतु अजित पवारांवर गल्लीबोळातील हाके बोलतो आणि त्यावर बोलायला कुणी नाही.” केवळ अजित पवारांकडे काम करून घ्यायला यायचं आणि त्यांच्यावर कोणी बोलत असेल तर गप्प बसायचं, हे योग्य नसल्याचं मिटकरी यांनी ठणकावून सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ब्रँड बाजारात असतो! नीलम गोऱ्हेंनी मनसेचे नेत्याला थेट ‘फुटकळ’ म्हटले!
- “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम!”; आदित्य ठाकरेंची रामदास कदमांवर खरमरीत टीका
- ‘बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा; भाजपची कवितेतून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








