Share

“अहमदाबादचं ‘कर्णावती’ करून दाखवाच!”; संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना थेट ओपन चॅलेंज!

“हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव कर्णावती करून दाखवा,” असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.

Published On: 

Uddhav Thackeray criticized Amit Shah

छत्रपती संभाजीनगर: स्वतःच्या बालेकिल्ल्यात काही करायची हिंमत नाही आणि दुसऱ्यांच्या घरात आगी लावता? असा जळजळीत सवाल करत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज भाजपला त्यांच्याच ‘होम ग्राउंड’वर ललकारले आहे. संभाजीनगरमधील सभेत ठाकरेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच टार्गेट करत एक Open Challenge दिलंय, ज्यामुळे दिल्लीतही खळबळ उडाली आहे. “हिंमत असेल तर आधी अहमदाबादचं नाव ‘कर्णावती’ करून दाखवा,” असा एल्गार ठाकरेंनी पुकारला आहे.

Uddhav Thackeray Slams Amit Shah 

“तुमच्यात ती हिंमतच नव्हती…”

शहराच्या नामांतराचे श्रेय लाटणाऱ्या भाजपचा समाचार घेताना ठाकरे कडाडले. “छत्रपती संभाजीनगर हे नामकरण मी अभिमानाने सांगतो, की मीच केलंय. तो बाळासाहेबांचा आदेश होता आणि माझ्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत मी तो निर्णय घेतला. जर आम्ही ते केलं नसतं, तर भाजपमध्ये ती हिंमतही नव्हती.” अमित शहा जिथून निवडून येतात, त्या अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, मगच आमच्या नादाला लागा, असा इशाराच त्यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही