Share

“त्यांच्या पैशावर नाचणारी महिला…”; Karuna Munde यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Women who dance and sing on Dhananjay Munde’s money are having fun after he became a minister. I have all the evidence, I will present it in court, Karuna Munde has warned.

Published On: 

Karuna Munde makes serious allegations against Dhananjay Munde

🕒 1 min read

Karuna Munde । माझगाव सत्र न्यायालयाने (Mazgaon Sessions Court) एक महत्त्वाचा निर्णय देत करुणा मुंडे (Karuna Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील संबंध हे केवळ लिव्ह-इन नव्हे, तर लग्नासारख्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे करुणा मुंडे या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळायला पात्र असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलंय. धनंजय मुंडेंची याचिका फेटाळात कोर्टानं करुणा मुंडे यांना दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Karuna Munde Serious Allegations On Dhananjay Munde

“मी कोणी नाचणारी, गाणारी बाई नाही किंवा ठेवलेली बाई देखील नाही. मी दोन मुलांना जन्म दिलाय. त्यांच्यावर इमानदारीने प्रेम केलंय. कोर्टाने सांगोतल्याप्रमाणे मला माझ्या नवऱ्याप्रमाणे लाईफस्टाईल जगण्याचा हक्क आहे, त्यांना या सर्व गोष्टी पूर्ण कराव्या लागतील”, असं करुणा मुंडे यांनी म्हंटल.

“२७ वर्षे स्वत:च मंगळसूत्र गहाण ठेवून, शक्य होईल तितकं सर्व करुन मी त्यांना साथ दिली आहे. आज मंत्री झाल्यावर त्यांच्या पैशावर नाचणारी, गाणारी महिला मजा करत आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, मी ते कोर्टात सादर करणार आहे. मी त्यांच्यासाठी काय त्याग केलाय, तेही कोर्टात सांगणार आहे”, असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही