Walmik Karad । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली.
या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जी कागदपत्रं मागितली होती ती सर्व देण्यात आली आहेत. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी, असा अर्ज आम्ही न्यायालयात दिला असून त्यावर वाल्मिक कराडकडून कोणताही खुलासा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होते का? कोर्टाकडून यावर काय सुनावणी होते?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Walmik Karad Application In Court
दरम्यान, या हत्येचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. आपण निर्दोष असल्याचा, या खुनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्याने केला आहे, असे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :