🕒 1 min read
दिल्ली – सरकारी वकील उज्जल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर वर्णी लागली आहे. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात मुख्य आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात त्यांची निर्णायक भूमिका राहिली होती.
निकम यांच्यासोबतच परराष्ट्र सेवा क्षेत्रातील अनुभवी अधिकारी हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षण तज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी संविधानाच्या अनुच्छेद ८० अंतर्गत आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून या नियुक्त्या केल्या आहेत.
Ujjwal Nikam nominated to Rajya Sabha
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर भाजपकडून उमेदवार असलेले उज्ज्वल निकम यांना ही नवी राजकीय संधी मिळाली आहे. लोकसभेत यश न मिळाल्यानंतर आता ते नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेत सक्रिय होतील.
या चारही नियुक्त्या राज्यसभेतील रिक्त झालेल्या राष्ट्रपती नियुक्त जागांवर करण्यात आल्या आहेत. यातून देशाच्या विविध क्षेत्रांतील जाणकार आणि अनुभवी व्यक्तींना विधीमंडळात योगदान देता यावे, हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिक्षण अधिकारी शाळेत येऊन काय करतात ते सर्वांना माहित, शिक्षक भरतीसाठीही पैसे लागतात- नितीन गडकरी
- VIDEO- हायवेनंतर थेट मसनघाट! BJP नेत्याचे स्मशानभूमीत महिलेसोबत ‘कांड’
- ‘माझा व्हिडिओ मॉर्फ केला, राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार’ – संजय शिरसाटांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











