शिक्षण अधिकारी शाळेत येऊन काय करतात ते सर्वांना माहित, शिक्षक भरतीसाठीही पैसे लागतात- नितीन गडकरी

Nitin Gadkari exposes bribes in teacher hiring, says shortcuts in education won’t lead to success.

Published On: 

Nitin Gadkari , narendra modi ,Navi Mumbai Airport

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहून थेट शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर प्रहार केला. “शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पैसे द्यावे लागतात, हे मला माहिती आहे,” असं सांगत गडकरींनी उपस्थितांसमोर शिक्षण विभागातील दैनंदिन भ्रष्टाचाराची गंभीर बाब उघड केली.

गडकरी म्हणाले, “शिक्षण अधिकारी शाळेत येतात, पण ते नेमकं काय करतात, हे सगळ्यांना ठाऊक आहे.” सध्या विदर्भात शिक्षक भरती घोटाळ्याची चर्चा रंगलेली असताना, गडकरींचं ( Nitin Gadkari ) हे विधान अधिकच लक्षवेधी ठरलं आहे.

Nitin Gadkari Slams Education Sector

शिक्षण संस्थांनी ‘चलता है’ असा दृष्टिकोन बाळगू नये, असं सांगताना गडकरी म्हणाले, “शॉर्टकट कुठेही मारू नका, जिथे जिथे शॉर्टकट माराल, तिथे तुम्ही शॉर्ट व्हाल.” या वक्तव्याला उपस्थितांकडून टाळ्याही मिळाल्या.

आपल्या वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करत गडकरी म्हणाले, “माझी पत्नी एका शिक्षण संस्थेची अध्यक्षा आहे. मी तिला सांगितलं, शिक्षक भरतीसाठी कधीही पैसे घेऊ नकोस. गुणवत्तापूर्ण शिक्षक, चांगली इमारत आणि प्रेरित विद्यार्थी मिळाले, तरच संस्थेची विश्वासार्हता वाढते, असं ते म्हणाले.

गडकरी यांनी शिक्षणात सार्वत्रिक प्रवेशाबरोबरच गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला. “प्रवेशासाठी रांगा लावल्या जातात, पण केवळ नावापुरतं शिक्षण देणं हे योग्य नाही. संस्था भविष्यात विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात का, हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे अडचणी असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवा,” असं म्हणत गडकरींनी शैक्षणिक संस्थांना खुलेपणाने संवाद साधण्याचं आवाहन केलं. गडकरींच्या ( Nitin Gadkari ) या वक्तव्यांमुळे शिक्षणातील भ्रष्टाचारावर नव्याने लक्ष केंद्रीत झालं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही