🕒 1 min read
Karuna Munde । माझगाव सत्र न्यायालयाने (Mazgaon Sessions Court) एक महत्त्वाचा निर्णय देत करुणा मुंडे (Karuna Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील संबंध हे केवळ लिव्ह-इन नव्हे, तर लग्नासारख्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
Karuna Munde Allegations On Dhananjay Munde
त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोपही केले आहेत. “मी ठेवलेली बाई नाही. मला दोन मुलं आहेत. 25-50 कोटी रुपये घेऊन मी शांत बसेल असे मुंडे आणि त्यांच्या गॅंगला वाटले होते. मात्र माझी लढाऊ प्रवृत्ती आहे”, असं करुणा मुंडे यांनी म्हंटल आहे. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांची औरंगजेबाशी तुलना केली आहे.
“संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हे फारच क्रूर आहे. क्रूर वृत्तीने ही हत्या झालेली आहे. औरंगजेबावरती एक चित्रपट आला आहे. मात्र औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती ही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडा गँगची आहे. सुंब जळालं पण पीळ गेला नाही, अशी त्यांची प्रवृत्ती आहे,” असे गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Walmik Karad याची संपत्ती जप्त होणार?; उज्ज्वल निकम यांनी दिली मोठी माहिती
- “शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही…”; Ajit Pawar यांचं विधान चर्चेत
- जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार?; Supriya Sule म्हणाल्या, “मला सुनेत्रा वहिनींचा फोन…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








