Supriya Sule | 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. एकाच कुटुंबात वाद निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी देखील शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबाने एकत्र येणं टाळलं. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
यामुळे पवार कुटुंबियांचे राजकीय मतभेद वाढतच गेले. अशातच अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा निश्चित झाला असून यानिमित्ताने पवार कुटुंब एकत्र येणार आहे. या साखरपुड्याचं निमंत्रण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मिळालं असून ते या सोहळ्याला उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule Reaction On Jay Pawar Eangagement Ceremony
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता. मला आमंत्रण दिलं आहे. अर्थातच आमंत्रण दिल्यावर जाणारच आहे.” सदानंद सुळे, सुप्रिया सुळे, आणि रेवती सुळे जाणार आहेत, बाकीच्यांचं मला माहित नाही, असं म्हणत त्यांनी शरद पवार जाणार की नाही याबाबत बोलणं टाळलं. जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित राहतात कि नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :