Share

‘बापाचंही नाव बदलून घ्या’, जलील यांच्या टीकेवर Chandrakant Khaire यांनी सुनावलं; म्हणाले…

Chandrakant Khaire criticized imtiaz jaleel

Chandrakant Khaire | छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. अशातच शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी “ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं नाव खुलताबादवरून बदलून रत्नपूर ठेवावं”, अशी मागणी केलीय.

त्यावर बोलताना AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी ‘तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या’, असं म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खैरे आहे, ते आहेच. हे नाव आम्ही कधीही बदलत नाही. इम्तियाज जलील काहीही म्हणतात. त्यांच्या म्हणण्याला आम्ही महत्त्व देत नाही”, असा पलटवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.

त्याचबरोबर “रामराज्य असताना खुलताबादचे नाव भद्रावतीनगर होते. महाभारतावेळी या शहराचे नाव रत्नपूर ठेवण्यात आले. मात्र औरंगजेबाच्या कटकारस्थानामुळे खुलताबाद हे नाव ठेवण्यात आलं. रत्नपूर हे नाव पौराणिक आहे. त्यामुळे खुलताबादचं हेच नाव झालं पाहिजे”, अशी मागणीही खैरे यांनी केली आहे.

इम्तिआज जलील यांचं वक्तव्य काय?

“तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नावं बदलण्याची मालिका सुरूच झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलंय तरी काय?”, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. “हिंमत असेल तर गुजरात आणि अहमदाबादची नावं का बदलत नाही? मोदी आणि शाह यांना ही दोन नावं बदलायला सांगा. विचारा त्यांना की, गुजरातमध्ये अहमद भाई चांगलं वाटतं का?”, असे सवाल इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :

“Imtiaz Jaleel says whatever he wants. We don’t give importance to what he says,” Chandrakant Khaire has criticized.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now