Share

‘लबाडांनो पाणी द्या!’ मोर्चात आदित्य ठाकरे उतरणार; पाणीटंचाई विरोधात एल्गार

Aditya Thackeray to lead a protest march in Chhatrapati Sambhajinagar on May 16 against severe water shortage, as part of Shiv Sena (UBT)’s “Labadanno Pani Dya” campaign.

Published On: 

Aditya Thackeray to Lead Water Crisis Protest in Chhatrapati Sambhajinagar on May 16

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर | शहरातील तीव्र पाणी टंचाई विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुरू असलेल्या ‘लबाडांनो पाणी द्या’ या जनआंदोलनात आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) उतरले आहेत. येत्या १६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाचा समारोप केला जाणार आहे.

शहरातील नागरिकांना १२ ते १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावी लागत आहे. या गंभीर समस्येसाठी शिवसेनेने थेट सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे शहराला ही अवस्था ओढवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Aditya Thackeray to Lead Water Crisis Protest in Chhatrapati Sambhajinagar on May 16

या पार्श्वभूमीवर शिवसेना १३ एप्रिलपासून ‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत जनआंदोलन राबवत आहे. रिकाम्या हंड्यांचे तोरण, स्वाक्षरी मोहीम, पाणी की अदलात, जनजागृतीसाठी दिंडी व पालखी यात्रा, तसेच घरोघरी पत्रके वाटून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली आहे. या आंदोलनाने पाणी प्रश्नावरून शहरात मोठा उद्रेक निर्माण केला आहे.

मोर्चाच्या तयारीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहरातील वार्ड निहाय बैठका सुरू केल्या असून, शिवसेना भवनात नियोजन बैठकींचे सत्र सुरू आहे. नवी पाणीपुरवठा योजना केव्हा पूर्ण होणार याचा ठोस अंदाज कोणीही देत नसल्याने संतप्त नागरिकांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे हा मोर्चा अधिक आक्रमक आणि लक्षवेधी ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या