मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून (Thackeray Gat) बंडखोरी करत शिंदे गटात (Shinde Gat) प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. संजय दिना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आक्रमक भूमिका घेत पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत संजय पाटील यांच्यावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बंडखोरी करणारे खासदार शिवसेनेत गेलेले नसून वेगळ्या गटात गेले आहेत. त्यांच्या वागणुकीतून त्या गटाची संस्कृती दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. “एका पळपुट्या खासदाराने सर्वांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आमचे खासदार संजय राऊत यांनी अगोदरच त्यांना सांगितलेले आहे की लाईनवर राहा नाहीतर लाईनवर आणावे लागेल, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही सवाल उपस्थित केले. हे सर्व प्रकार भाजप नेत्यांना दिसत नाहीत का? पंतप्रधान हे सगळं पाहत आहे की नाही. काही नेते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत असून त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. तसेच वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी आणि भ्रष्ट पैशांच्या व्यवहारासाठी हे प्रयत्न सुरू आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
संजय दिना पाटील यांच्यावर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, “जर त्यांच्यात हिम्मत आणि लाज असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे यावे.” खासदारांना सुरक्षा दिलेली आहे. ही सुरक्षा कशासाठी दिलेली आहे. लोक यांच्यापासून सुरक्षित राहिले पाहिजेत की यांना लोकांपासून धोका आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
📌महत्वाच्या बातम्या
- ‘कोणाचेही घर बॉम्बने उडवू देणार नाही’; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका
- राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटील आक्रमक; म्हणाले, “मी मर्द लोकांसोबत गेलोय”
- नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी; न्यायालयात अखेर सत्य सिद्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












