Share

‘कोणाचेही घर बॉम्बने उडवू देणार नाही’; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडत धमक्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Published On: 

CM Devendra Fadnavis

नागपूर : ‘ऑपरेशन टायगर’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आता शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) स्पष्ट भूमिका मांडत धमक्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

शिवसेना पक्षाचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची आणि बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “कोणाचेही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही. पोकळ धमक्यांना कोणीही घाबरू नये. कोणी धमक्या देत असेल तर त्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील.”

दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना ठाकरे गटातून वेगळे झालेले सहा खासदार सध्या जनतेच्या रोषाला सामोरे जात आहेत. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करणे आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून, आता या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही