Share

नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी; न्यायालयात अखेर सत्य सिद्ध

नसरापूर प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. सरकारी पक्षाकडून फाशीची मागणी करण्यात आली आहे.

Published On: 

Bhimrao Kamble

पुणे : जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasrapur) येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा निर्णय आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आली होती. विक्रमी वेळेत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसांत सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने आरोपीविरोधातील सर्व कलमांखालील गुन्हे सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.

खटल्यातील दोन कलमांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, तर एका कलमात जन्मठेप आणि एका कलमात 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
निकाल सुनावताना न्यायालयाने भीमराव कांबळे याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावेळी न्यायाधीशांनी त्याला विचारले, “तुला हा संपूर्ण प्रकार आठवतो का? आता तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यायची?”

यावर आरोपीने पुन्हा गुन्हा नाकारत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की, “मी त्या दिवशी मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी मुलीच्या डोक्याला मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती.” यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की, “आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झाला आहे. कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे. तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नसून त्याला खाली बसायला सांगितले.

यानंतर सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला कोणताही पश्चाताप नाही. त्याने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने 39 मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.

काय आहे नसरापूर प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे 2026 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर तपास यंत्रणांनी वेगाने तपास पूर्ण करून आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर साक्षीदारांच्या साक्षी आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही