प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामसभेत एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच सुनील पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.
या घटनेनंतर संबंधित तरुणाने पाचोरा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माजी सरपंच सुनील पाटील यांच्यासह अन्य दोन जणांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटील यांनी स्वतःची बाजू मांडत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले.
आपण या ग्रामसभेला केवळ एक नागरिक म्हणून उपस्थित होतो, असे पाटील यांनी स्पष्ट केले. संबंधित व्यक्तीने एका बखर प्लॉटमध्ये सांडपाणी सोडले होते. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर आपण १ तारखेला ग्रामपंचायतीत तक्रार दाखल केली होती, असेही पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील पाटील यांनी आपली बाजू मांडली. “मी त्याला या संदर्भात जाब विचारल्यानंतर तो मला अरेरावीची उत्तरे देत होता. त्या तरुणाला माझ्यासोबत विनाकारण भांडण करायचे होते. त्याने मुद्दामून अरेरावी केली व माझ्या अंगावर आला. माझा हेतू नसताना माझ्याकडून जे अनावधानाने घडले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे सुनील पाटील यांनी म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील एमपीएससी आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकरांना विद्यार्थ्यांचा विरोध; ‘गो बॅक’च्या घोषणा
- विधान परिषद निवडणूक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे वारे; महायुतीसह मविआच्या अडचणी वाढणार
- डिमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे मोजताय? ‘ही’ सोपी युक्ती वापरून वाचवा तुमचे पैसे
Quick Answers
जारगाव ग्रामसभेत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच सुनील पाटील यांच्यासह अन्य दोन जणांवर पाचोरा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.
सुनील पाटील यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणाला विनाकारण भांडण करायचे होते, त्याने अरेरावी केली आणि तो अंगावर आला. तसेच, कोणताही हेतू नसताना अनावधानाने घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









