Share

जळगाव हादरलं! ‘त्या’ व्हिडीओमुळे उघड झालं प्रकरण; महिलेवर अत्याचाराच्या आरोपात 14 जणांना अटक

जळगाव जिल्ह्यात महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Published On: 

Jalgaon Crime

🕒 1 min read

जळगाव : जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 पैकी 14 आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. (Jalgaon Crime)

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 2 जून रोजी देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. 40 वर्षीय महिला तिच्या परिचित तरुणासोबत त्या ठिकाणी गेली असताना काही तरुणांनी त्यांना अडवले आणि धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, दोन आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेवेळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. यानंतर एका संशयिताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आला आले. घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

व्हिडीओ काढणाऱ्यांवरही कारवाई

या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींसोबतच घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या आणि व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या संशयितांवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत 14 जणांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रमुख आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 70(1), 77 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला आणि काही संशयित आरोपी एकमेकांच्या परिचयातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही