प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी (Pune MPSC Protest) भेट देण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच आंदोलकांनी त्यांच्याविरोधात ‘गो बॅक’ आणि ‘परत जा’ अशा घोषणा दिल्या.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यासाठी खासदार निंबाळकर तेथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, तुमची परीक्षा आयुष्यभरासाठी आहे, तर आमची निवडणूक केवळ पाच वर्षांपुरती असते. तुमच्या यातना आमच्यापेक्षा खूप जास्त असून, सर्वसामान्य माणसांसोबत माझा संपर्क असल्याने तुमच्या मागण्या मला सरकारपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मात्र, याच वेळी काही विद्यार्थ्यांनी निंबाळकर यांच्याकडे थेट एकनाथ शिंदे यांना फोन लावून राजीनामा मागण्याची आग्रही मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या या भूमिकेनंतर निंबाळकर यांनी, तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो, हे माझं चुकलं का? एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा कोण घेऊ शकतं? मी तुमची भावना १०० टक्के सरकारपर्यंत पोहोचवेन, असे स्पष्ट केले. त्यांचे हे भाषण सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी पुन्हा ‘गो बॅक’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर प्रतिक्रिया देताना निंबाळकर म्हणाले की, आपण नेहमीच सामान्य माणसाची साथ दिली असून, अनेक धडका घेऊनच इथपर्यंत पोहोचलो आहे.
पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना निंबाळकर म्हणाले की, आपण मतदारसंघासाठी २४ तास खपत आहोत. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला, कारण सत्तेशिवाय माणसं काम करू शकत नाहीत. दरम्यान, स्पर्धा परीक्षा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईसाठी विनंती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तत्पूर्वी, या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. देशाची परिस्थिती अशी आहे की, पदवी घेतलेले सुशिक्षित तरुण रस्त्यावर बसले आहेत आणि ज्यांच्याकडे पदवी नाही ते खुर्चीवर बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली. कोणालाही शिक्षणाची कदर नसल्याचे सांगत ते म्हणाले की, आपण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधू, पण खुर्चीत बसलेल्यांपेक्षा हे विद्यार्थी जास्त शिकलेले आहेत. तसेच, जशा बोली लावल्या जातात तसेच करा, जो जास्त पैसा देईल त्यालाच जागा द्या, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद निवडणूक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे वारे; महायुतीसह मविआच्या अडचणी वाढणार
- डिमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे मोजताय? ‘ही’ सोपी युक्ती वापरून वाचवा तुमचे पैसे
- ‘काही अडचण असेल तर खुशाल जळा’, गोविंदासोबतच्या कथित अफेअरवर कोमल राणीने सोडले मौन
Quick Answers
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच आंदोलकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात ‘गो बॅक’ आणि ‘परत जा’ अशा घोषणा दिल्या.
काही विद्यार्थ्यांनी निंबाळकर यांच्याकडे थेट एकनाथ शिंदे यांना फोन लावून राजीनामा मागण्याची आग्रही मागणी केली.
स्पर्धा परीक्षा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईसाठी विनंती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पदवी घेतलेले सुशिक्षित तरुण रस्त्यावर बसले आहेत आणि ज्यांच्याकडे पदवी नाही ते खुर्चीवर बसले आहेत, अशी टीका अभिजीत दिपके यांनी केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









