प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: घरातील किराणा आणि इतर साहित्य स्वस्तात मिळत असल्याने बहुतांश नागरिकांचा डिमार्टमध्ये खरेदी करण्याकडे कल असतो. यामुळे पैशांची मोठी बचत होते. मात्र, खरेदी केल्यानंतर सामान नेण्यासाठी ग्राहकांना अनेकदा २० रुपये देऊन कॅरी बॅग विकत घ्यावी लागते.
खरेदी केलेल्या सामानासाठी साधारणपणे दोन ते तीन पिशव्या लागतात. यासाठी ग्राहकांचे जवळपास शंभर रुपये खर्च होतात. मात्र, खरेदी करताना एका सोप्या युक्तीचा वापर केल्यास हे अतिरिक्त पैसे वाचवता येऊ शकतात.
डिमार्टमध्ये डाळ, तांदूळ आणि इतर कडधान्ये भरण्यासाठी ग्राहकांना मोफत कॅरी बॅग उपलब्ध करून दिलेल्या असतात. खरेदी करताना या पिशव्या मोठ्या आकाराच्या घेतल्यास, त्यात इतर सामानही सहज ठेवता येते. यामुळे वेगळी कॅरी बॅग विकत घेण्याची वेळ येत नाही आणि पैशांची बचत होते.
दरम्यान, दुकानाचा लोगो (चिन्ह) असलेल्या पिशव्यांसाठी ग्राहकांकडून पैसे आकारण्यावर काही दिवसांपूर्वीच ग्राहक आयोगाने कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या पिशव्यांसाठी पैशांची मागणी करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘काही अडचण असेल तर खुशाल जळा’, गोविंदासोबतच्या कथित अफेअरवर कोमल राणीने सोडले मौन
- ‘मला आता भारतात शांतता जाणवत नाही’; संजय दत्तच्या विधानामुळे सोशल मीडियावर संताप
- नागपूर पदवीधरमधून नितेश कराळे मास्तर अपक्ष लढणार; ५ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज
Quick Answers
डिमार्टमध्ये सामान नेण्यासाठी ग्राहकांना अनेकदा २० रुपये देऊन कॅरी बॅग विकत घ्यावी लागते. साधारण दोन ते तीन पिशव्यांसाठी ग्राहकांचे जवळपास शंभर रुपये खर्च होतात.
डिमार्टमध्ये डाळ, तांदूळ आणि इतर कडधान्ये भरण्यासाठी ग्राहकांना मोफत कॅरी बॅग दिल्या जातात. या पिशव्या मोठ्या आकाराच्या घेतल्यास त्यात इतर सामानही ठेवता येते, ज्यामुळे वेगळी पिशवी विकत घेण्याची गरज पडत नाही.
दुकानाचा लोगो (चिन्ह) असलेल्या पिशव्यांसाठी ग्राहकांकडून पैसे आकारण्यावर ग्राहक आयोगाने कडक ताशेरे ओढले असून, अशा प्रकारच्या पिशव्यांसाठी पैशांची मागणी करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









