सोलापूर, 5 ऑक्टोबर: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी (वय ३७, रा. अर्धनाही, ता. मोहोळ) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत अत्यंत कठोर कारवाई केली आहे. या कारवाईनुसार शरद कोळी (Sharad Koli) यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात फरार असलेल्या शरद कोळी यांना पोलिसांनी सांगली येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार ही स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली. रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी पूर्ण करून कडक पोलीस बंदोबस्तात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
पंढरपूर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी यांच्यावर सोलापूर व आसपासच्या परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाळू चोरी आणि तस्करी, व्यापारी व नागरिकांकडे खंडणी मागणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, अशा विघातक कृत्यांची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. ‘एमपीडीए’ कायद्याच्या कलम ३(१) अन्वये पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भाषेत टीका करणारे नेते म्हणून शरद कोळी यांची ओळख आहे. आगामी विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर थेट एक वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ग्रामसभेत तरुणाला मारहाण प्रकरण: गुन्हा दाखल होताच माजी सरपंच सुनील पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी
- पुण्यातील एमपीएससी आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकरांना विद्यार्थ्यांचा विरोध; ‘गो बॅक’च्या घोषणा
- विधान परिषद निवडणूक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे वारे; महायुतीसह मविआच्या अडचणी वाढणार
Quick Answers
शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई केली असून, त्यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शरद कोळी यांच्यावर वाळू चोरी आणि तस्करी, व्यापारी व नागरिकांकडे खंडणी मागणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एका गुन्ह्यात फरार असलेल्या शरद कोळी यांना पोलिसांनी सांगली येथून ताब्यात घेतले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









