राजा भिंगे हत्या प्रकरणात पोलिसांचे मोठे यश; सर्व ५ आरोपींना अटक, ‘गुजरात’ कनेक्शन उघड

पंढरपूरमधील राजा भिंगे हत्या प्रकरणाचा छडा लागला असून पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. २०१७ मधील माजी नगरसेवकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खून झाल्याचे उघड.

Published On: 

Pandharpur firing incident and police investigation

पंढरपूर, 22 नोव्हेंबर: पंढरपूर येथील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ऊर्फ राजा भिंगे यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणात सामील असलेल्या सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या २०१७ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठीच भिंगे यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भिंगे हा भोईटे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता आणि नुकतीच त्याची यातून निर्दोष मुक्तता झाली होती.

भिंगे यांच्या हत्येचा कट रचताना पुण्यातून नागे नावाच्या शूटरला बोलावण्यात आले होते. या शूटरने काही दिवस पंढरपूर शहरात मुक्काम करत भिंगे यांची रेकी केली. रात्री जेवण झाल्यानंतर भिंगे हे एकटेच शतपावली करण्यासाठी बाहेर पडतात, याची माहिती मिळाल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी या हल्ल्यात वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे.

या गुन्ह्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आत पोलिसांनी तपास वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुसऱ्याच दिवशी दोन आरोपींना ताब्यात घेतले. यातील प्रवीण ऊर्फ तात्या शिंदे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) याला सर्वात आधी अटक करण्यात आली. अधिक तपास करताना उरलेले आरोपी गुजरातमार्गे राजस्थानला पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यानंतर पोलिसांनी विविध पथके रवाना केली.

काल पोलिसांनी गुजरातच्या सोमनाथ येथून उर्वरित तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपासात पोलिसांनी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी येथील वैभव ज्ञानेश्वर फसलकर, अनिकेत गवळी, स्वप्नील आहेरे आणि पुण्याच्या हडपसर येथील रोहन नागे या चौघांना ताब्यात घेतले. यापैकी फसलकर, आहेरे आणि नागे यांना गुजरात येथून अटक करण्यात आली. सध्या सर्व पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून, या हत्याकांडामागे आणखी कोणी मुख्य सूत्रधार आहे का, याचा कसून तपास केला जात असल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही