Share

शुभमन गिलचा पंचांशी वाद, रिव्ह्यूवरून गोंधळ; अभिषेक शर्मा म्हणाला शांत हो..!

Shubman Gill argues with umpire after controversial run-out and failed DRS; Abhishek Sharma steps in to calm him down during GT vs SRH IPL 2025 clash.

Published On: 

Shubman Gill Century in India vs England 3rd ODI

IPL 2025 च्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात शुभमन गिलने ( Shubman Gill ) आपला संयम गमावला. शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा गिल या सामन्यात मैदानावर संतापलेला दिसून आला. फलंदाजीदरम्यान 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गिल रनआऊट झाला. मात्र निर्णय वादग्रस्त ठरला. तिसऱ्या पंचाने दिलेल्या निर्णयामुळे गिल संतप्त झाला आणि त्याने थेट पंचांशी वाद घातला. यामुळे त्याचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. त्याने 38 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती.

Shubman Gill-Umpire Argument After DRS Drama in GT vs SRH

या वादाचा दुसरा भाग हैदराबादच्या डावात पाहायला मिळाला. प्रसिद्ध कृष्णाच्या 14व्या षटकात अभिषेक शर्मा एलबीडब्ल्यूसाठी अपीलनंतर नाबाद ठरला. गिलने रिव्ह्यू घेतला, मात्र बॉल ट्रॅकिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पष्ट चित्र समोर आलं नाही. केवळ इम्पॅक्ट आणि विकेटचा डेटा दाखवण्यात आला, परिणामी गुजरातला रिव्ह्यू गमवावा लागला. त्यामुळे गिल पुन्हा पंचांवर भडकला. यावेळी अभिषेक शर्माने हस्तक्षेप करत गिलला शांत होण्यास सांगितलं.

या विजयासह गुजरातने प्लेऑफच्या दिशेने वाटचाल केली असून, हैदराबाद मात्र स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 10 पैकी 7 सामने गमावल्यामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्वप्न भंगले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही