🕒 1 min read
प्रतिनिधी – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे पुन्हा एकत्र येतील का, या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे कुटुंबातील नातेवाईक प्रयत्नशील आहेत आणि ही जबाबदारी सध्या शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि अनिल परब यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर म्हणाले, “राज-उद्धव एकत्र येत असतील तर त्यात एकनाथ शिंदेंनाही स्थान दिलं पाहिजे. ते बाळासाहेबांची खरी शिवसेना पुढे नेत आहेत,” असं स्पष्ट करत त्यांनी शिंदेंच्या भूमिकेचा बचाव केला.
Thackeray Brothers Reunion Buzz
पण खैरे यांनी मात्र कीर्तिकरांच्या विधानाला सरळ झिडकारलं. “एकनाथ शिंदे? त्यांनी उद्धव आणि आदित्य यांना त्रास दिला आहे. आम्हाला एकनिष्ठ माणसं हवीत. त्यांचा मुलगा आमच्याकडे असल्यामुळे कीर्तिकर पश्चात्ताप करत आहेत,” असा थेट टोला खैरेंनी लगावला.
खैरे यांनी राणे कुटुंबालाही चांगलंच धारेवर धरलं. “नारायण राणे यांचे पुत्र भाजप संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते असभ्य बोलतात, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यांची अनेक प्रकरणं बाहेर येतील आणि हेच जेलमध्ये जातील,” असा इशाराही त्यांनी दिला.
राजकारणात चाललेल्या या घडामोडी पाहता, ठाकरे बंधूंमधील युतीचा विचार आता केवळ अफवांपुरता मर्यादित न राहता, सक्रिय हालचालींच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंचा संयमाचा सल्ला
- अक्षयला जॅकपॉट! ‘हाऊसफुल 5’ ने दोन दिवसांत मोडले 14 चित्रपटांचे रेकॉर्ड!
- करण जोहरने वयाच्या 53 व्या वर्षी काढला ‘या’ बॉडी पार्टचा इन्शुरन्स; कारण वाचून थक्क व्हाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now