Share

करण जोहरने वयाच्या 53 व्या वर्षी काढला ‘या’ बॉडी पार्टचा इन्शुरन्स; कारण वाचून थक्क व्हाल!

Karan Johar has reportedly insured his face at age 53. Social media is abuzz with speculations and reactions.

Published On: 

Karan Johar insured 'this' body part at the age of 53; You will be surprised to read the reason!

Karan Johar : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण वेगळं आहे. वयाच्या 53 व्या वर्षी करण जोहरने त्याच्या चेहऱ्याचा इन्शुरन्स घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

एका व्हायरल रेडिट पोस्टनुसार, करण जोहरने अनेक वेळा दक्षिण कोरियाला गुपचूप भेटी दिल्या असून, त्याच दरम्यान त्याने हा इन्शुरन्स घेतला असल्याचा दावा केला जातो. अद्याप याबाबत करण जोहरने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Karan Johar insured ‘this’ body part at the age of 53

सामान्यपणे इन्शुरन्स म्हटलं की आरोग्य, अपघात किंवा मालमत्तेचं संरक्षण डोळ्यांसमोर येतं. मात्र अलीकडे सेलिब्रिटींमध्ये चेहरा, पाय, आवाज, कंबर यांसारख्या बॉडी पार्ट्सचा इन्शुरन्स घेण्याचा ट्रेंड वाढला आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजाचा, तर जॉन अब्राहमने त्यांच्या कमरेचा इन्शुरन्स घेतल्याचंही म्हटलं जातं. हॉलिवूडमध्ये तर जेनिफर लोपेझ, मारिया कॅरी यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या curves, पाय किंवा व्होकल कॉर्डसचा कोट्यवधींचा विमा घेतला आहे.

चेहऱ्याचा इन्शुरन्स घेणं म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर ब्रँडची सुरक्षा असते. अपघात, नुकसान झाल्यास उत्पन्नात खंड पडू नये यासाठी हे आर्थिक कवच म्हणून काम करतं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही