Share

नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंचा संयमाचा सल्ला

Nitesh Rane’s bold speech sparks reactions; Nilesh Rane urges caution publicly.

Published On: 

Nitesh Rane Nilesh Rane

🕒 1 min read

प्रतिनिधी – राज्यात आक्रमक वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले मंत्री नितेश राणे यांचं ताजं विधान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलं आहे. भाजपच्या एका मेळाव्यात त्यांनी थेट शिंदे सेनेवर टीका करत, “सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय,” असं वक्तव्य केलं. या विधानानंतर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

विशेष म्हणजे, नितेश राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांचे मोठे बंधू आणि शिंदे गटाचे निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनीच त्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला. “सभेत बोलणं सोपं असतं, पण त्याचे परिणाम दूरगामी असतात. आपण महायुतीचा भाग आहोत हे विसरून चालणार नाही,” असा स्पष्ट सल्ला निलेश राणेंनी दिला.

Nilesh Rane urges caution publicly

मात्र, नितेश राणेही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी सोशल मीडियावरून “निलेशजी तुम्ही tax free आहात” असं टोला लगावून उत्तर दिलं. त्यामुळे भाजप-शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या