🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मराठवाड्यातील नेते संजय शिरसाट यांच्या पुत्रावर ( Siddhant Shirsat ) गंभीर आरोप झाले आहेत. सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक व धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणावर एमआयएमचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “मंत्र्याचा मुलगा तिसरं लग्न करतो आणि नंतर महिलेला धमकावतो, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. महिला वकिलामार्फत नोटीसही पाठवली गेली आहे. पण तरीही सगळे शांत का आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Siddhant Shirsat Accused of Harassment and Cheating
जलील यांनी सरकारवर आणि महिला आयोगावरही टीका केली. “आम्ही असं काही केलं असतं, तर सगळा मिडिया आमच्या घरासमोर जमा झाला असता. महिला आयोग गप्प बसणार का? रुपाली चाकणकर यांनी पुढे येऊन संबंधित महिलेला भेटावं आणि न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
📌 नेमकं प्रकरण काय?
2018 साली सोशल मीडियावरुन सिद्धांत शिरसाट आणि महिलेची ओळख झाली. चेंबूर येथील फ्लॅटवर त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. महिलेला दिवस गेल्यानंतर, जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोप आहे. शिवाय, 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने विवाह झाल्याचा दावा महिलेनं केला असून, त्याचे पुरावेही असल्याचं तिने सांगितलं. अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय शिरसाट यांचे पुत्र निर्दोष? महिलेने घेतला यु-टर्न, मोठा खुलासा!
- महिला आयोगावर आधीच टीका, आता मंत्रीपुत्रावर अत्याचाराचे आरोप; प्रशासन कोणती भूमिका घेणार?
- संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांतवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now